मामा ने पक्षालाच मामा बनवलं : विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा, सत्यजित ताबेंना दिले... | पुढारी

मामा ने पक्षालाच मामा बनवलं : विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा, सत्यजित ताबेंना दिले...

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

नाशिक पदवीधर निवडणूकीत सत्यजीत तांबे यांचा विजय हा निश्चित आहे. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सत्यजीत यांना पाठिंबा दिला आहे. भाजप कार्यकर्ते त्यांनाच मतदान करत आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नैतिकता म्हणून भाजप कार्यकर्त्यांच्या केलेल्या कामाचा आदर सन्मान सत्यजित ठेवतील असा मला विश्वास आहे. असे सांगताना, सत्यजित यांनी भाजपात प्रवेश करावा असे निमंत्रण राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यांना दिले आहे.

नाशिक पदवीधर निवडणूकीसाठी आज मतदान पार पडत आहे. विखे पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावरही निशाणा साधला. बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय असेल माहिती नाही, पण त्यांची भूमिका व्यक्तिगत आहे. मामा ने काय करावा तो मामाचा प्रश्न आहे. परंतु मामा ने आता पक्षालाच मामा बनवले असल्याचे विखे म्हणाले.

सत्यजीत यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा असा आग्रह आमचा राहणारच आहे. असे म्हणत विखे पाटील यांनी सत्यजीत यांना थेट भाजपात प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले आहे. अहमदनगर जिल्ह्यात भविष्यात भाजपची ताकद वाढवण्याची जबाबदारी ही विखे पाटील यांच्यावर असणार आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे.

हेही वाचा :

Back to top button