अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी सकाळी दहा पर्यंत ५.४९ टक्के मतदान

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघासाठी आज सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत ५.४९ टक्के मतदान झाले. वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातही सुरुवातीला गतीने मतदान झाले.
अमरावती विभागातील २६२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. विद्यमान आमदार तथा भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्यात जोरदार लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
- नाशिक पदवीधर निवडणूक : मविआ उमेदवार शुभांगी पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
- अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
- लवंगी मिरची : पदवीधर?