अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क | पुढारी

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

अकोला ; पुढारी वृत्‍तसेवा : आज राज्यातील पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यात दहा टक्के मतदान झाले होते. अमरावती पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांनी अकोल्यातील आरडीजी महाविद्यालयात आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

डॉ. रणजित पाटील तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पहिल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा दुसऱ्या निवडणुकीत अधिक मते मिळाली होती. आता तिसऱ्या निवडणुकीत सुद्धा यापेक्षा अधिक मते मिळणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्‍त केला आहे. म्हणून माझी स्पर्धा ही माझ्याशीच आहे आणि अमरावती विभागातील पदवीधर माझ्या पाठीशी आहेत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळपासूनच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सर्वच मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली होती. जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण यांनी अकोला शहरातील मतदान केंद्रावर भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.

विभागात 262 मतदान केंद्रावर मतदान..

अमरावती विभागात एकूण 262 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. अमरावती जिल्ह्यात 64 हजार 344, अकोला जिल्ह्यात 50 हजार 606, बुलडाणा 37 हजार 894, वाशिम जिल्ह्यात 18 हजार 50 तर यवतमाळ जिल्ह्यात 35 हजार 278 मतदार नोंदणी झाली आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी (कंसात पक्षाची नावे) : धीरज रामभाऊ लिंगाडे (इंडियन नॅशनल काँग्रेस), डॉ. रणजीत विठ्ठलराव पाटील (भारतीय जनता पार्टी), अनिल ओंकार अमलकार (वंचित बहुजन आघाडी), डॉ. गौरव रामदास गवई (बहुजन भारत पार्टी), तर अपक्ष म्हणून अनिल वकटूजी ठवरे, अनंतराव राघवजी चौधरी, अरुण रामराव सरनाईक, ॲड. आनंद रविंद्र राठोड, धनराज किसनराव शेंडे, ॲड. धनंजय मोहनराव तोटे, निलेश दिपकपंत पवार (राजे), उपेंद्र बाबाराव पाटील, शरद प्रभाकर झांबरे पाटील, श्याम जगमोहन प्रजापती, डॉ. प्रविण रामभाऊ चौधरी, प्रविण डिगंबर बोंद्रे, भारती ख. दाभाडे, माधुरी अरुणराव डाहारे, संदेश गौतमराव रणवीर, लक्ष्मीकांत नारायण तडसे, विकेश गोकुलराव गवाले, सुहास विठ्ठलराव ठाकरे, संदीप बाबुलाल मेश्राम.

हेही वाचा : 

Back to top button