चंद्रपूर : मूल तालुक्यात आढळला बनावट देशी दारूचा कारखाना; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

चंद्रपूर : मूल तालुक्यात आढळला बनावट देशी दारूचा कारखाना; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : येथील उत्पादन शुल्क विभागाने आज (दि.२५) मोठी कारवाई करत बनावट देशी दारूचा कारखाना उघडकीस आणला आहे. गोट फार्मच्या जागेवर प्रवरा डिस्टीलरीच्या नावाने हा दारू कारखाना सुरु होता. यावेळी उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी दारू तयार करण्याचे सुमारे १६.५० लाख रूपयाचे साहित्य जप्त करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

चंद्रपूर : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंमुर्डे यांचे मरणोत्तर देहदान

मूल तालुक्यातील चितेगांव शेतशिवारात अरूणा मरसकोल्हे यांच्या मालकीच्या ए.व्ही.जी. गोट फार्म (शेळी पालन केंद्र) परिसरात बनावट देशी दारू तयार करून विकली जात असल्याची माहिती चंद्रपूर येथील उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकाने आज चितेगाव शेतशिवारात पाहणी केली. गोट फार्मचच्या आवारात देशी दारू संबंधी काही साहीत्य आढळून आले. त्यामुळे पोलिस पथकाने गोटफार्मच्या दोन्ही खोल्यांची कसुन पाहणी केली असता एका खोलीत बनावट देशी दारू तयार करण्याचा मिनी कारखानाच उघडकीस आला. त्यामध्ये पाच ते सहा प्लास्टिक ड्रम मध्ये दारू निर्मिती साठी स्पीरीट आढळून आले. सिन्टेक्सच्या दोन मोठ्या टाकी पैकी एका टाकीमध्ये तयार केलेली बनावट दारू सापडली. बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्याकरीता लहान आणि मोठ्या प्लास्टिकच्या बाटल्या, त्यावर चिकटवण्या करीता संञा लिहीलेले स्टीकर बाँक्स. प्रवरा देशी दारू प्रवरानगर जि. अहदनगर लिहीलेले खरड्याचे मोठे खोके, दारूला संत्राचा वास येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आँरेज इसेन्स फ्लेवरच्या बाटल्या असे एकुण १६ लाख ५० हजाराचे साहित्य हस्तगत केले. या प्रकरात मोठी टोळी गुंतल्याचा संशय उत्पादन शुल्क् विभागाने वर्तविला आहे. ज्या गोट फार्मच्या ठिकाणी बनावट देशी दारू निर्मितीचा अवैद्य मिनी कारखाना उजेडात आला.

हे वाचलंत का? 

Back to top button