नागपूर : क्रिकेटपटू उमेश यादवला मॅनेजरने घातला ४४ लाखांचा गंडा

Cricketer Umesh Yadav
Cricketer Umesh Yadav
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मूळचा नागपूरकर असलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादवला त्याच्या मॅनेजरने ४४ लाख रुपयांनी गंडा घातला आहे.  या प्रकरणी कोराडी पोलिसात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आता उमेश यादवचा मॅनेजर  शैलेश ठाकरे याचा शोध घेत आहेत.

याबाबतची माहिती अशी की, उमेश यादवने भूखंड खरेदीसाठी कोराडी रोडवरील स्टेट बँकेत ४४ लाख रुपयांची रक्कम जमा करून ठेवली होती. ही रक्कम उमेशच्या मॅनेजर शैलेश ठाकरेने परस्पर स्वत:च्या स्वार्थासाठी वापरल्याचे उघडकीस आले आहे. ठाकरेने ४४ लाख रुपयांतून उमेश यादवसाठी प्रॉपर्टी तर खरेदीच केली नाही. उलट ठाकरे याने बँक खात्यातून परस्पर पैसे काढून स्वतःच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केली. उमेशला यांची माहिती मिळाल्यानंतर त्याने पैसांची वारवार मागणी केली, परंतु, ठाकरेने पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. शेवटी त्याने मॅनेजर ठाकरेने लाखो रुपयांची फसवणूक केल्याने कोराडी पोलिसात धाव घेतली.

उमेश यादवने कोराडी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी आरोपी शैलेश ठाकरेविरुद्ध भादंवि कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भारतीय संघातील जलदगती गोलंदाज उमेश यादव क्रिकेटच्या निमित्ताने सतत बाहेर रहात असल्याने बँकिंगसह ऑफिसची सर्व कामे करण्याचा अधिकार या मॅनेजरला देण्यात आला होता. यातूनच त्याने उमेश यादवची फसवणूक केल्‍याचे उघड झाले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news