Bacchu Kadu Accident News : आमदार बच्चू कडू यांना भरधाव दुचाकीने उडवले; डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत 

Bacchu Kadu Accident News : आमदार बच्चू कडू यांना भरधाव दुचाकीने उडवले; डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत 
Published on
Updated on

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : चांदूर बाजारचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. (Bacchu Kadu Accident News) एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसत असताना भरधाव दुचाकीने त्यांना उडवले. त्यांच्या डोक्याला मार लागला असल्याने अमरावती शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. शहरातील कठोरा नाका परिसरातील आराधना चौकात हा अपघात बुधवारी (११ जानेवारी) सकाळी घडला. अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच त्यांच्या हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.

माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे एका कार्यक्रमाला जाण्याकरिता अमरावतीत आले होते. कठोरा नाक्यावरील आराधना चौकात एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसण्याकरिता ते जात होते. दरम्यान भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यात ते रस्त्यावरील दुभाजकावर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच पायाला मार लागल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. (Bacchu Kadu Accident News)
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news