E-scooter : अमरावती : भंगारातून ई-स्कूटरचा आविष्कार; निम्या किंमतीत दुचाकी तयार | पुढारी

E-scooter : अमरावती : भंगारातून ई-स्कूटरचा आविष्कार; निम्या किंमतीत दुचाकी तयार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा ; शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांच्या रोजगाराला चालना देण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा तंत्रज्ञान विभाग करीत आहे. या सामूहिक प्रयत्नातून भंगारातून  ई -वाहन (E-scooter) निर्मितीचा आविष्कार घडवल्याचे दिसून आले. अमरावतीचे सुपुत्र सुमेध उद्धवराव रामटेके व सुप्रिया सुमेध रामटेके यांनी भंगारातून ई स्कूटरचा अविष्कार केला आहे.

तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून विविध पदविका अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना प्रकल्प केंद्रित शिक्षण दिले जात आहे. त्यातून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी फेकून दिलेल्या दुचाकीतून ई -स्कूटर (E-scooter) तयार केली. यातून निश्चितच उद्योग विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी त्यांना डॉ. आनंद अभ्यंकर, प्रा. रोहित भानुशाली, प्रा. विवेक बावधाने सारख्या तज्ज्ञ मार्गदर्शकांची साथ मिळाली.

या प्रयोगाबाबत महिला उद्योजिका सुप्रिया रामटेके म्हणाल्या की, प्रयोगशील प्रकल्प हाताळल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. स्किल अपग्रेड होतात. त्याचा फायदा त्यांना नोकरी मिळविणे आणि स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी होतो. या क्षेत्रामध्ये महिला विद्यार्थी इतर महिला विद्यार्थींनीनीही जास्तीत जास्त प्रमाणात या क्षेत्रामध्ये नाव उज्वल करावे. विद्यापीठाच्या व्यावसायिभिमुख शिक्षण प्रणालीमुळे आजच्या युवकांच्या करियरला आकार व दिशा मिळत आहे. सोबतच इलेक्ट्रिकल (E-scooter) बोट निर्मितीचा आविष्कार करण्यात आल्याने विद्यापीठाची मुले आता समुद्राच्या लाटेवर स्वार झाली आहेत. पर्यावरण पूरक आणि कमी खर्चात समाज उपयोगी वस्तूंच्या निर्मितीकडे तंत्रज्ञान विभागाची कामगिरी महत्वपूर्ण ठरली आहे. लवकरच ही बोट पर्यावरण स्थळावर वापरली जाणार आहे.

व्यवसायाभिमुख शिक्षण प्रणालीमुळे दिशा..

व्यवसायाभिमुख शिक्षण प्रणालीमुळे आजच्या युवकांच्या करियरला दिशा देत आहोत. बॅटरीवर चालणारी वाहने निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून नवीन स्पेअर पार्टचा वापर करून ई-वाहने तयार केली जातात. मात्र पेट्रोलवर चालणारी आणि बंद अवस्थेत असणाऱ्या वाहनांचे काय करायचे? याबाबत फारसा विचार होतांना दिसत नाही. तंत्रज्ञान विभागाकडून बंद पडलेल्या वाहनांवर विविध प्रयोग करून ई- स्कुटरची निर्मिती केली जात आहे.

गाडीची क्षमता प्रती चार्जिंग ४० km इतकी आहे. जुन्या गाडीच्या तुलनेत इलेक्ट्रिक गाडीचे वजन १६ ते २० किलो इतके कमी आहे. केवळ दोन दिवसांच्या अवधीत ही गाडी तयार होते. महाराष्टातील ज्यांना आपली दुचाकी इलेक्ट्रिक करायची आहे. त्यांनी जुनी गाडी व रुपये तीस ते चाळीस हजार इतक्या किंमतीत विद्यार्थ्यांकडून रेट्रोफीटिंग करून घ्यावी, याद्वारे एका सामाजिक बांधिलकीतून आमच्या विद्यार्थ्यास प्रकल्प हाताळण्यास मिळेल.

सुमेध रामटेके, आयटी तज्ज्ञ

विद्यार्थिनींनाही रोजगाराची संधी

प्रयोगशील प्रकल्प हाताळल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि स्किल अपग्रेड होतात. त्याचा फायदा त्यांना चांगली नोकरी मिळविणे आणि स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी होतो. या क्षेत्रामध्ये महिला विद्यार्थी इतर महिला विद्यार्थिनींनीही जास्तीत जास्त प्रमाणात या क्षेत्रामध्ये नाव उज्वल करावे. विद्यापीठाच्या व्यावसायिभिमुख शिक्षण प्रणाली मुळे आजच्या युवकांच्या करियरला आकार व दिशा मिळत आहे.

सुप्रिया सुमेध रामटेके, महिला उद्योजिका

हेही वाचा : 

Back to top button