अमरावती: पुढारी वृत्तसेवा : सावत्र बापाने पंधरा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात वरुड पोलिसांनी आरोपी विरोधात बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्या ( पोस्को ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पीडित मुलीची आई मोठ्या मुलीच्या सासरी गेली होती. त्यामुळे पीडिता सावत्र बापासोबत घरात एकटीच होती. १ जानेवारी रोजी मुलगी घरातील कामे आटोपून हॉलमध्ये बसली असताना सावत्र बापाने तिला धमकी देत अतिप्रसंग केला. या घटनेची माहिती दिल्यास पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ६ जानेवारीपर्यंत त्याने मुलीवर वारंवार अतिप्रसंग केला. आई परत आल्यानंतर मुलीने अत्याचाराची माहिती दिली. आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी विरोधात बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्या ( पोस्को ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :