Cold Wave : नागपुरात कडाक्याच्या थंडीमुळे दोघांचा मृत्यू | पुढारी

Cold Wave : नागपुरात कडाक्याच्या थंडीमुळे दोघांचा मृत्यू

नागपूर; पुढारी ऑनलाईन : नागपूर शहरात गेल्या दोन दिवसांत दोन अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हे दोन्ही मृत्यू थंडीने झाल्याची शंका व्यक्त केले जात आहे. शहरातील मोरभवन जवळ एका 70 वर्षीय वृद्धचा तर गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत 35 ते 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. (Cold Wave)

दरम्यान या दोघांचाही मृत्यू कडाक्याच्या थंडीमुळे झाल्याचे बोलले जात आहे. हे दोन्ही जण थंडीत उघड्यावर झोपल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पुढील वैद्यकीय तपासणीनंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन वेळापत्रकावरसुद्धा काहीसा परिणाम झाला आहे. लोक शेकोटी पेटवून ठिकठिकाणी ऊब मिळविण्याचा तर आबालवृद्ध अधिकाधिक गरम कपड्याचा आधार घेताना दिसत आहेत. (Cold Wave)

अधिक वाचा :

Back to top button