विज्ञान प्रदर्शनातील काही अजब-गजब गोष्टी; जाणून घ्या मातीशिवाय शेती कशी करावी? (व्हिडिओ) | पुढारी

विज्ञान प्रदर्शनातील काही अजब-गजब गोष्टी; जाणून घ्या मातीशिवाय शेती कशी करावी? (व्हिडिओ)

नागपूर; पुढारी ऑनलाईन : सध्याच्या विज्ञान युगात मातीशिवाय शेती करणे शक्य आहे. नागपुरातील अमरावती रोडवर आयोजित १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या विज्ञान प्रदर्शनात मातीशिवाय केवळ पाण्याचा वापर करून घरच्या घरी कमीत कमी जागेत, टेरेसवर परसबाग तयार करण्याची माहिती देणारा स्टॉल इ-हॉलमध्ये लावण्यात आला आहे. उद्या सायन्स काँग्रेसचा समारोप होणार आहे. हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे न्युट्रीयन्ट पाण्याचा वापर करून पालेभाज्या, फळभाज्या, फुले, शोभीवंत रोपे यांचे उत्पादन घेता येते. विशेष म्हणजे यात कोणताही रासायनिक खते व किटकनाशकांचा उपयोग न करता केवळ सेंद्रीय पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.

वाहतुकीचे नियम पाळा आणि बक्षीस मिळवा

ट्रॅफिक नियमांचे पालन न करणाऱ्यांना नेहमीच दंड केला जातो. पण नियमांचे पालन करून गाडी चालवणाऱ्या चालकांना काय? आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. वाहतूक नियम पाळणाऱ्यांना आता बक्षीस मिळणार आहे. १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या विज्ञान प्रदर्शनात याबाबत माहिती देण्यात येत आहे.

रस्ते वाहतुक मंत्रालय व नागपूर महानगर पालिका यांच्या सहकार्यातून एका खासगी कंपनीद्वारे नागपूर शहरात प्रायोगिक स्तरावर पुढील महिन्यात हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘ट्रॅफिक रिवार्ड’ या ॲपद्वारे नोंदणी करणाऱ्या वाहनचालकांना त्यांचे वाहनावर लावण्यासाठी एक रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटीफिकेशन डिव्हाईस घरपोच मिळेल. या डिव्हाइसची फ्रीक्वेंसी कॅच करण्यासाठी नागपुरातील वेस्ट हाय कोर्ट रोड ते जपानी गार्डन रोड या मार्गावर प्रायोगिक स्तरावर १० सिग्नलवर सेंन्सर लावण्यात आले आहेत. हे सेंन्सर सिंग्नलसोबत जोडण्यात आले असून आपली गाडी लाल, पिवळ्या व हिरव्या सिग्नलचे पालन करते का याची तपासणी ते करणार आहेत. नियमाचे पालन करणाऱ्या वाहनचालकाच्या मोबाईल ॲप खात्यात प्रत्येक सिग्नलवर 10 रिवार्ड पॉईंट जमा करण्यात येतील. या रिवार्ड पॉइंटचा उपयोग अर्थातच आपल्याला विविध कंपन्यांची उत्पादने खरेदी करतांना सवलत मिळविण्यासाठी करता येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button