

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सरत्या चोवीस तासांत कोरोना रुग्णसंख्येत 228 ने वाढ झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून शुक्रवारी (दि.६) देण्यात आली. दरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या 2503 पर्यंत खाली आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 4 कोटी 46 लाख 79 हजार 547 लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे.
गत चोवीस तासांत कोरोनाने चार लोकांचा बळी घेतला. यातले दोनजण केरळमधले असून प्रत्येकी एकजण उत्तराखंड आणि बिहारमधला आहे. कोरोनाने आतापर्यंत 5 लाख 30 हजार 714 लोकांचा बळी घेतलेला आहे. मृत्यूदर 1.19 टक्क्यांच्या आसपास स्थिर आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण 0.01 टक्के इतके आहे. तर रिकव्हरी दर 98.80 टक्के इतका आहे. गत चोवीस तासात सक्रिय रुग्णसंख्येत 51 ने घट नोंदविण्यात आली.
हेही वाचलंत का ?