Nagpur Winter Session | महाराष्ट्राचे बुजगावणे हाकलून द्या, विरोधकांची घोषणाबाजी | पुढारी

Nagpur Winter Session | महाराष्ट्राचे बुजगावणे हाकलून द्या, विरोधकांची घोषणाबाजी

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे, राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा अशी घोषणाबाजी करीत महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला. (Nagpur Winter Session) आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. (Nagpur Winter Session)

आंदोलनकर्त्यांनी हातात संघाच्या काळ्या टोप्या फिरवत महाराष्ट्राचे बुजगावणे त्वरित हाकला, अशी जोरदार मागणी केली. तसेच शेतकरी जसे शेतात बुजगावणे उभारतात तसेच विधान भवनाच्या पायऱ्यांवर बुजगावणे मांडून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. यावेळी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

बुजगावणे हे शेतमालाच्या संरक्षणाकरिता शेतात उभारले जातात. पाखरांनी शेतमाल खाऊ नये असा त्यामागचा हेतू असतो.

राज्यातदेखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या पुढे गायरान खाल्ली जात आहे, भूखंड चोरले जात आहेत, महापुरुषांचा अपमान केला जात असून हे बुजगावणेरुपी सरकार गप्प असल्याची खरमरीत टीका यावेळी विरोधकांनी केली.

आंदोलनकर्त्या आमदारांच्या घोषणाबाजीतून राज्यपालांबाबत आमदारांमध्ये किती असंतोष आहे हे दिसून आले. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार रोहित पवार, वैभव नाईक, विकास ठाकरे, वर्षा गायकवाड आदींचा सहभाग होता.

Back to top button