२००४ मध्‍ये संधी असतानाही अजित पवारांना मुख्यमंत्री केले नाही : देवेंद्र फडणवीस | पुढारी

२००४ मध्‍ये संधी असतानाही अजित पवारांना मुख्यमंत्री केले नाही : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : २००४ विधानसभा निवडणुकीनंतर संधी असतानाही  अजित पवार यांना मुख्यमंत्री केले नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला.  राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सत्रात ते बोलत होते.

आम्ही आमच्या काळात विदर्भासाठी काय केले? यावर फडणवीस म्‍हणाले की, “गोसीखुर्द, टेक्सटाईल पार्क, दूध संकलन वाढले, विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना वीज सवलत, 27 पुलांची कामे, मेट्रो, आयआयएम आणि अन्य संस्था अशी कितीतरी कामे केले आहेत.”

पतंजलीचा टप्पा जानेवारीत येतोय. विदर्भातले अडकलेले प्रकल्प मार्गी लावले. दूध संकलनात मदर डेअरीचा प्रकल्प सुरु केला. शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात भाव मिळाला. विदर्भातील शेतकऱ्यांना वीज सवलत करुन दिली. विदर्भातले प्रकल्प मार्गी लावले, असेही या वेळी फडणवीस म्‍हणाले.

हेही वाचा : 

Back to top button