

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी अजित पवार यांचा वेळ आल्यावर बारामती मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा दिला होता. त्यावर पवार यांनी बावनकुळे यांना आज सबुरीचा सल्ल दिला आहे.
अजित पवार यांनी बावनकुळेंचा कार्यक्रम करू असा इशारा दिला. यावर बावनकुळे यांनी दादांना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला. आज अजित पवार म्हणाले, "हा इशारा ऐकल्यापासून माझी ना झोपच उडालीये… मला तर आता राजकीय संन्यास घ्यावासा वाटतो" असा मिश्कील टोला विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना लगावला.
तीन आठवड्याचे अधिवेशन व्हावे, अशी आमची इच्छा होती. पण सत्ताधाऱ्यांचे बहुमत असल्याने त्यांनी दोन आठवड्यांचेच कामकाज निश्चित केले असे पवार म्हणाले. आज विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावात सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांवर करण्यात आलेल्या बेताल वक्तव्यासंदर्भात, मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा या विषयांचा समाविष्ट असेल. कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे दोषी आहेत. लक्षात आल्यानंतर ते सभागृहात मांडणे, हे विरोधकांचे कामच आहे, असेही पवार म्हणाले.
-हेही वाचा