विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील चौथ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच आजही विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक सूर आळवला. हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा, शेतकऱ्यांना धोका, मंत्र्यांना खोका.. विदर्भाला धोका, मंत्र्यांना खोका, महाराष्ट्राला धोका… मंत्र्यांना खोका, शेतकरी हैराण, सरकार खातो गायरान, सीमावासी हैराण.. सरकार खातो गायरान या घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.