आणखी दोन मंत्री निशाण्यावर…शंभुराज देसाई, राठोडविरोधात ठाकरे गट आक्रमक; पुरावे देणार | पुढारी

आणखी दोन मंत्री निशाण्यावर...शंभुराज देसाई, राठोडविरोधात ठाकरे गट आक्रमक; पुरावे देणार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा,  सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांना टार्गेट केल्यानंतर ठाकरे गट आमदारही आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्यांना टार्गेट केले आहे. अब्दुल सत्तार यांच्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शंभूराज देसाई यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत.

शिंदे – फडणवीस सरकारमधील हे प्रमुख मंत्री महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आहेत. विना परवानगी बांधकाम केल्याचा शंभूराज देसाई यांच्यावर आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी घोषणाबाजी करत सामंत, सत्तार, राठोड आणि शंभूराज देसाई यांच्याही नावाने आरोपकेले.

ठाकरे गट : खोटे प्रमाणपत्र

शंभूराज देसाई यांनी शेत जमिनीवर बांधकाम केले आहे. पण सातबारावर या बांधकामाचा कुठेही उल्लेख नाही. शंभूराज देसाई यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप ठाकरे गटाच्या आमदारांकडून करण्यात येत आहे. महाबळेश्वरमधील नावली इथे शेत जमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा देसाई यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. यासंबंधी जे काही पुरावे आणि आवश्यक कागदपत्रे आहेत, ती विधिमंडळात ठेवण्यात येतील, असा इशारा ठाकरे गटाच्या आमदारांनी दिला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याप्रमाणेच संजय राठोड यांनीही गायरान जमिन खासगी व्यक्तीला विकल्याचा आरोप आहे. वाशिम जिल्ह्यातील सावरगाव येथील ५ एकर जमिन राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द ठरवून विक्रीस अनुकूल कार्यवाही करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने गायरान जमिनींच्या विक्रीला सक्त मनाई केली असताना हा व्यवहार झाला.

हेही वाचा

Back to top button