समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, २ ठार, २ जखमी, लहान मुलगी कारच्या बाहेर उडून शंभर फुटांवर पडली | पुढारी

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, २ ठार, २ जखमी, लहान मुलगी कारच्या बाहेर उडून शंभर फुटांवर पडली

अकोला : पुढारी वृत्तसेवा; समृद्धी महामार्गावर (मंगळवार) रात्री 2 वाजता झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. तर दोनजण जखमी झाले आहेत. जखमींना अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये महिलेसह बालकाचा समावेश आहे.

नागपूर येथील जोशी कुटूंब मुंबई वरून नागपूरकडे जात होते. कारंजासमोर नागपूर डे जाताना दहा किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाल्याचे वृत्त आहे. अपघात एवढा भीषण होता की, मृत लहान मुलगी ही कारच्या बाहेर उडून समृद्धी हायवे रोडच्या बाजूला म्हणजेच खाली शंभर फूट अंतरावर जाऊन पडली होती. तिला शोधण्यासाठी एक ते दीड तास लागला. बाजूला असलेल्या गवतामुळे ती दिसण्यास विलंब झाला. पण तिचा मृत्यू झाला होता.

अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग लोकेशन 108 श्री जय गुरुदेव रुग्णवाहिका रुग्णसेवक विशाल डांबरे, मातोश्री रुग्णवाहिका रुग्णसेवक विधाता चव्हाण, समृद्धी रुग्णवाहिका अजय घोडेस्वार, ग्रामपंचायत विळेगाव रुग्णवाहिका रुग्णसेवक अमोल गोडवे, नवनिर्माण रुग्णवाहिका विनोद खोंड, श्री गुरमंदिर रुग्णवाहिका रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी धाव घेत मदत पुरवली. जखमी आरोही जोशी (14) व अॅड. अजय जोशी (52) यांना अकोल्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button