नांदेड : वाई बाजार येथे नीलगायीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वारासह नीलगायीचा जागीच मृत्यू | पुढारी

नांदेड : वाई बाजार येथे नीलगायीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वारासह नीलगायीचा जागीच मृत्यू

वाई बाजार, पुढारी वृत्तसेवा : माहूर-किनवट राष्ट्रीय महामार्गावरील वाईबाजार नजिकच्या वाघाई टेकडीजवळ नीलगायीची दुचाकीस्वारास धडक बसल्याने दुचारीस्वारासह नीलगायीचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. आज (दि.२७) सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. सुरज भारत राठोड (वय २५) रा. निराळा, ता. किनवट असे मृत तरूणाचे नाव आहे. तर आकाश नत्थू पवार (वय २२) हा जखमी झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहीतीनुसार, सुरज आणि आकाश दुचाकीने (क्र. एम. एच. २६ बी.वाय. ०२६०) यवतमाळकडे निघाले होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वाई बाजार येथील वाघाई टेकडी जवळ आले असता त्यांच्या दुचाकीला रस्ता ओलांडणाऱ्या नीलगायीने धडक दिली. यात सुरजचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश गंभीर जखमी झाला. उपस्थितांनी दोघांना तातडीने माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच सुरजचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आकाशवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयाकडे हलविण्यात आले. या अपघातात नीलगायीचा देखील मृत्यू झाला.

हेही वाचा :

Back to top button