नाताळसाठी आलेल्या मुलीवर पणजीत बसमध्ये अत्याचार

संग्रहित
संग्रहित
Published on
Updated on

पणजी; वृत्तसेवा :  नाताळ साजरा करण्यासाठी वास्को येथून बसने पणजीत आलेल्या मुलीवर बस चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. बसचालक संशयित चंद्रशेखर लमाणी (वय 35) याला महिला पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

झुवारीनगर – वास्को येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक गट खासगी बसने (जीए 06 टी 5376) पणजीत नाताळ साजरा करण्यासाठी आला होता. हे सर्व विद्यार्थी एका पार्टीला गेले. ज्यात मुलींचाही सहभाग होता. तेथे सर्वांनी मद्यप्राशन केल्याची चर्चा आहे. संध्याकाळी पीडित विद्यार्थिनीला अस्वस्थ वाटू लागल्याने ती एकटीच हॉटेलच्या खाली असलेल्या वास्कोहून आणलेल्या बसमध्ये झोपली. काही वेळाने बस चालक चंद्रशेखरने या मुलीवर बसमध्ये बलात्कार केला. जर कुणाला सांगितलेस तर तुझीच बदनामी होईल, अशी धमकी लमाणी याने पीडित मुलीला दिली. त्यामुळे ती मुलगी गप्प राहिली.

संशयित चालक बाहेर निघून गेल्यावर मैत्रिणीला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर रात्री 11.40 वाजण्याच्या सुमारास बसचालका विरोेधात महिला पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली. पोलिस पथकाने चंद्रशेखरच्या मुसक्या आवळल्या. सोमवारी सकाळी फॉरेन्सिक लॅबोरेटरीजच्या तज्ज्ञांनी बसमधील काही नमुने जमा केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news