MLA residence video : आमदारांच्या कपबशा धुतल्‍या जातायत टॉयलेटमध्‍ये : आ. मिटकरींनी शेअर केला व्‍हिडीओ

MLA residence video
MLA residence video

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून  (दि. १९) सुरु झालं आहे. राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यादाच हे अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन चर्चेत आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील आमदार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. यातच राष्ट्रवादीच्या आमदार अमोल मिटकरी यांनी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील गैरसोयीबद्दलचा एक व्हिडीओ (MLA residence video) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करत सत्ताधारांना धारेवर धरले आहे. पाहा नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये. 

MLA residence video : कपबशा धुतल्‍या जातायत विशेष टॉयलेटमध्‍ये

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूरमधील आमदार निवासामधील एक व्हिडीओ आपल्या अकाउंटवर शेअर करत लिहीले आहे की,"हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था." सोबत त्यांनी आझादी का अमृत महोत्सव असा हॅशटॅग दिला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अमोल मिटकरी यांनी सरकारच्या बोंगळ कारभारावर निशाणा साधला आहे. २० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दिसतं आहे की, एक कर्मचारी टॉयलेटमधील बेसीनमध्ये कपबश्या धुवत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाल्‍यानंतर आता आमदार निवासस्थानातील गैरसोयीबद्दल आमदारांच्‍या काय प्रतिक्रिया येतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news