नागपूर : आपल्या तान्हुल्यासह हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या आमदार अहिरेंचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक | पुढारी

नागपूर : आपल्या तान्हुल्यासह हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या आमदार अहिरेंचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक  केले.  दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूस केली.

विधानसभा सदस्य सौ. अहिरे यांनी आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळासमवेत आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थिती दर्शवली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी आमदार आहेर यांची भेट घेऊन त्यांची आणि बाळाची विचारपूस केली.

कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान

विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे, हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.  राज्याच्या विधीमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जाहीर कौतुक केले. या वेळी आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासुबाई कल्पना वाघ  देखील उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button