नाशिक : विनाहेल्मेट दुचाकीस्वाराचा झाडावर आदळून मृत्यू | पुढारी

नाशिक : विनाहेल्मेट दुचाकीस्वाराचा झाडावर आदळून मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षावर आदळून विनाहेल्मेट दुचाकी चालविणारा युवक ठार झाल्याची घटना पाथर्डी गाव शिवारात घडली. रोहित चंद्रकांत पाटील (२५, रा. सदिच्छानगर, इंदिरानगर) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे.

रोहित शुक्रवारी (दि. २) रात्री 10.15 च्या सुमारास हेल्मेट न घालता दुचाकीवरून वडनेर गेटकडून इंदिरानगरच्या दिशेने जात होता. त्याच्यासमवेत मागील सीटवर मित्र अक्षय मनेरे (२१, रा. इंदिरानगर) होता. रोहितचे वेगवान दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर जाऊन आदळली. त्यात रोहितसह अक्षयला गंभीर मार लागला. रोहितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी शहर पोलिस हेल्मेट सक्ती मोहीम राबवत आहेत. या मोहिमेमुळे अनेकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर सुरू केला आहे, तर काही जण अद्याप हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे, असे आवाहन नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button