नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या मेडिकल कॉलेज अर्थात शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात सिनियरकडून ज्युनियर विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. या रॅगिंग प्रकरणी सहा सिनियर वैद्यकीय विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा रॅगिंग झालेला ज्युनियर विद्यार्थी एमबीबीएस प्रथम वर्षाचा आहे. तर रॅगिंग घेतल्याचा आरोप असलेले सहा विद्यार्थी एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर इंटर्नशीप करणारे सिनियर्स आहेत. काही दिवसांपूर्वी सदर रॅगिंगचे प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थ्याने त्याची तक्रार आणि याविषयीचे काही पुरावे सेन्ट्रल रॅगिंग समितीकडे पाठविले होते. तपासांती सेंट्रल रॅगिंग समितीकडून मेडिकल रुग्णालय आणि महाविद्यालय प्रशासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा झाल्यानंतर रॅगिंगचा आरोप असलेल्या सहा विद्यार्थ्यांची 'इंटर्नशिप' रद्द करण्यात आली असल्याची माहिती मिळाली.
हेही वाचलंत का ?