धक्‍कादायक : परभणीतील कमलापूर येथे पतीने केले पत्नीचे शिर धडावेगळे | पुढारी

धक्‍कादायक : परभणीतील कमलापूर येथे पतीने केले पत्नीचे शिर धडावेगळे

ताडकळस (परभणी), पुढारी वृत्‍तसेवा : कमलापूर ( ता.पुर्णा ) येथील पतीने कोयत्याने पत्नीचा चेहरा विद्रुप करुन  शिर धडावेगळे केले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केले आहे. या घटनेमुळे कमलापूर परिसरात खळबळ उडाली असून घटनेचे कारण अस्पष्ट आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमलापुर येथे केशव गोविंदराव मोरे (वय ४३) व त्यांची पत्नी आशाबाई (वय ३७) राहत होते. मोरे दाम्‍पत्‍याला २ मुली व एक मुलगा आहे. मंगळवारी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास केशव मोरे  हातात धारधार शस्त्र हातात घेऊन आला. त्‍याने  पत्नी आशाबाईवर यांच्या चेह-यावर वार करून चेहरा विद्रुप केला. यानंतर त्‍याने शिर धडावेगळे केले. यानंतर तो एका हातात धारधार शस्त्र व दुसऱ्या हातात पत्नीचे शिर घेऊन घरासमोर फिरत होता. यामुळे कुंटुबातील नातेवाईकांसह गावात भितीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेची माहिती ग्रामस्‍थांनी ताडकळस पोलीसांना दिली. पोलीसांनी तात्‍काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. याप्रकरणी केशव गोविंदराव मोरे याच्‍यावर गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा  : 

Back to top button