एसटीने तीन महिन्यांत ९४ लाख प्रवाशांचा प्रवास; १८ कोटी रुपयांचे उत्पन्न | पुढारी

एसटीने तीन महिन्यांत ९४ लाख प्रवाशांचा प्रवास; १८ कोटी रुपयांचे उत्पन्न

वर्धा, पुढारी वृत्तसेवा :  प्रवाशांच्या सेवार्थ असे ब्रिद असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांनी प्रवासाला प्रवाशी प्राधान्य देतात. मागील तीन महिन्यांच्या कालावधीत एसटी महामंडळाच्या बसगाड्यांनी ९४ लाख प्रवाशांनी प्रवास केला. यातून महामंडळाला १८ कोटी रुपयांवर उत्पन्न मिळाले आहे.

अनेक थांब्यांवर खासगी वाहने उभी असतानाही अनेक प्रवासी बसची प्रतिक्षा करतात. बसला वेळ असला तरीही प्रवाशी बसनेच जातात.  महामंडळाच्या बसेसच्या प्रवाशांवर असलेल्या विश्वासाचीच ही पावती आहे.

मागील तीन महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत वर्धा विभागात ९४ लाख ३० हजार प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या बसगाड्यांनी प्रवास केला आहे. यातून महामंडळाच्या वर्धा विभागाला १८ कोटी ६१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने २१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या हंगामी कालावधीत अपेक्षित उत्पन्न तसेच किलोमीटरचे उद्दीष्ट दिले होते. त्यामध्ये वर्धा विभागाने महामंडळात प्रथम स्थान पटकाविले होते.

हेही वाचा 

धुळे : पिस्तुलाचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार ; संशयित आरोपीला अटक

हिंगोली : आखाडा बाळापूर ‘बोगस मजूर’ प्रकरणी पोलिसांकडून कार्यवाहीसंदर्भात टाळाटाळ

भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार

Back to top button