नागपूर : दारूच्या नशेत मित्राने केला भोसकून खून | पुढारी

नागपूर : दारूच्या नशेत मित्राने केला भोसकून खून

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : दारूच्या नशेत भरदिवसा मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याच्या घटनेने नागपुरातील गड्डीगोदाम चौक हादरला. प्रणय राजेश पात्रे (वय २५, बाराखोली परिसर) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी सत्यनेत्र यादव (वय २३, मानकापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, प्रणय आणि सत्यनेत्र दोघे चांगले मित्र होते. गुरूवार सकाळी ११ वाजताच्या दरम्यान गड्डीगोदाम चौक येथील सेंट मायकल शाळेच्या समोर दोघेही दारुच्या नशेत बसले होते. दोघांमध्ये वाद झाला, या वादातच सत्यनेत्र याने प्रणयच्या पोटावर चाकूने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने प्रणयचा मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून मृतदेह मेयो रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी संशयिताला अटक करून पुढील तपास सुरु केला आहे.

हेही वाचा :

Back to top button