Jama Masjid महिलांना जामा मशिदीत प्रवेश बंद : 'भारत आहे की इराण?' - महिला आयोग संतप्त | पुढारी

Jama Masjid महिलांना जामा मशिदीत प्रवेश बंद : 'भारत आहे की इराण?' - महिला आयोग संतप्त

पुढारी ऑनलाईन – दिल्लीतील मुघलकालीन जामा मशिदीत (Jama Masjid) महिलांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सोबत जर पुरुष किंवा कुटुंबातील पुरुष व्यक्ती असतील तरच महिलांना मशिदीत प्रवेश दिला जाणार आहे. मशिद प्रशासनाच्या या निर्णयावर मोठी टीका होत असून दिल्ली महिला आयोगाने ‘भारत आहे की इराण’ अशी संतप्त प्रतिक्रिया देली आहे.

मशिद प्रशासनाच्या या निर्णयाची गंभीर दखल दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांनी घेतली आहे. त्या म्हणाल्या, “हा तालिबानी पद्धतीचा हुकुम आहे, या विरोधात आम्ही मशिदीच्या शाही इमाम यांना नोटीस बजावली आहे.”

महिलांना मुक्तपणे मशिदीत येण्यासाठी मज्जाव करणे हा प्रकार भेदभाव करणारा आहे. प्रार्थनास्थळ सर्वांसाठी खुले असले पाहिजे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. हा आदेश स्त्रीविरोधी आणि भारतीय घटनेच्या विरोधात आहे, असे मालिवाल यांनी म्हटले आहे. पुरुष आणि स्त्री भाविकांत भेदभाव करणाऱ्या या आदेशाचा त्यांनी निषेध केला आहे. “मी जामा मशिदच्या शाही इमामांना नोटीस बजावत आहे. ही बंदी भारतीय घटनेच्या विरोधात आहे,” असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा

Back to top button