नागपूर : विदर्भात शिवसेनेपाठोपाठ युवासेनेला खिंडार | पुढारी

नागपूर : विदर्भात शिवसेनेपाठोपाठ युवासेनेला खिंडार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे शिंदे गटातील ४० आमदारांच्या विरोधात राज्यभर रान उठवत आहेत. तसेच उद्धव सेना बळकट करण्याचे भावनिक आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटातर्फे ठाकरे गटाला धक्के देणे सुरूच आहे. सध्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात असताना पूर्व विदर्भातील युवा सेनेचे पदाधिकारी फोडण्याचे काम जोरात सुरू आहे.

शिवसेनेचे ४० आमदार आणि अनेक जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, पदाधिकारी आपल्या बाजूने वळविल्यानंतर शिंदे गटाने युवा सेनेला जोरदार धक्का दिला आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे विदर्भ समन्वयक किरण पांडव यांनी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, ग्रामीण, रामटेक, भंडारा, गडचिरोली, नागपूर शहर या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविले आहे.
या पदाधिकाऱ्यांमध्ये सुनील यादव, अभिषेक गिरी, काजी जोगराणा, लखन यादव, राज तांडेकर, प्रफुल्ल सरवान, सोनाली वैद्य, नेहा भोकरे, दीपक भारसाखरे, रोशन कळंबे, शुभम नवले, हर्षल शिंदे आदींचा समावेश असल्याचे कळते. विशेष म्हणजे हे पदाधिकारी गोपनीयता बाळगत किरण पांडव यांच्या मार्गदर्शनात मुंबईत दाखलही झाले असून आज किंवा उद्या त्यांच्या प्रवेशाची अधिकृतपणे घोषणा होऊ शकते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button