

पुढारी ऑनलाईन डेस्क : २० नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरू होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी (FIFA WC 2022) संघांनी आपआपल्या संघांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी (दि.७) ब्राझीलने आपला संघ जाहीर केला. ब्राझीलने २६ सदस्यीय संघाची घोषणा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. यामध्ये ३९ वर्षीय अनुभवी खेळाडू डेनियल एल्वेसला संघात स्थान देत युवा खेळाडू फिरमिनो आणि फिलिप कौटिन्हो यांना कट्यावर बसवले आहे.
अॅस्टन व्हिलाचा स्टार स्ट्रायकर फिलिप कौटिन्हो दुखापतीमुळे फुटबॅाल विश्वचषक स्पर्धेच्या (FIFA WC 2022) संघात प्रवेश करू शकला नाही. दुसरीकडे, विंची, गॅब्रिएल, पेड्रो या युवा वेगवान फॉरवर्ड खेळाडूंना संघात स्थान दिल्यामुळे लिव्हरपूलचा स्टार फॉरवर्ड फिरमिनोला संघाबाहेर ठेवण्यात आले. ब्राझील संघातील २६ खेळाडूंपैकी १२ खेळाडू हे इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळतात.
विश्वचषक स्पर्धेमध्ये ब्राझीलचा पहिला सामना २५ नोव्हेंबरला सर्बिया विरूद्ध होणार आहे. या सामन्यापासून ते विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहेत. यानंतर ब्राझील संघाला स्वित्झर्लंड आणि कॅमेरून संघांचा सामना करावा लागणार आहे.
गोलकीपर : एलिसन (लिव्हरपूल), एडरसन (मँचेस्टर सिटी), वेव्हर्टन (पाल्मेरियास)
डिफेंडर : ब्रेमर (युव्हेंटस), अॅलेक्स सँड्रो (युव्हेंटस), एडर मिलिटो (रिअल माद्रिद), मार्किनोस (पीएसजी), थियागो सिल्वा (चेल्सी), डॅनिलो (युव्हेंटस), डॅनियल अल्वेस (पुमास), अॅलेक्स टेलेस (सेव्हिला)
मिडफिल्डर : ब्रुनो गुइमेरेझ (न्यूकॅसल युनायटेड), कासेमिरो (मँचेस्टर युनायटेड), फ्रेड (मँचेस्टर युनायटेड), एव्हर्टन रिबेरो (फ्लेमेंगो), फॅबिन्हो (लिव्हरपूल), लुकास पॅक्वेटा (वेस्टहॅम)
फॉरवर्ड्स : अँटोनी (मँचेस्टर युनायटेड), गॅब्रिएल जीसस (आर्सनल), गॅब्रिएल मार्टिनेली (आर्सनल), नेमार (पीएसजी), पेड्रो (फ्लेमेंगो), राफिन्हा (बार्सिलोना), रिकारलिसन (टोटेनहॅम), रॉड्रिगो (रिअल माद्रिद), व्हिनिसियस ज्युनियर(रिअल माद्रिद)
हेही वाचा;