Vijay Wadettiwar security : मी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करत असताना माझी सुरक्षा का काढली? वडेट्टीवारांचा सरकारला सवाल | पुढारी

Vijay Wadettiwar security : मी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करत असताना माझी सुरक्षा का काढली? वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : केवळ राजकीय विरोधक म्हणून राज्यातील नवीन सरकारने सुरक्षा कपात करणे योग्य नाही. सरकारमध्ये कोणत्याही पदावर नसलेल्या रवी राणांना सुरक्षा दिली जाते, मात्र मी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करत असताना सुद्धा सरकारने सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला. असे ट्विट करत माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर बातमी (Vijay Wadettiwar security)

Vijay Wadettiwar security : रवी राणांना सुरक्षा दिली जाते, मात्र…

शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या १५ नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. या निर्णयावर माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटल आहे, “केवळ राजकीय विरोधक म्हणून राज्यातील नवीन सरकारने सुरक्षा कपात करणे योग्य नाही. सरकारमध्ये कोणत्याही पदावर नसलेल्या रवी राणांना सुरक्षा दिली जाते. मात्र, मी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करत असताना सुद्धा सरकारने सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुढे असेही म्हंटले आहे की, सुरक्षा काढल्यामुळे नक्षलग्रस्त भागात मी करत असलेले काम किंवा दौरे कमी होणार नाही. मात्र, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा होता. “

कोणाची सुरक्षा कपात?

  • बाळासाहेब थोरात
  • जयंत पाटील
  • वरुण सरदेसाई
  • धनंजय मुंडे
  • संजय राऊत
  • विजय वडेट्टीवार
  • नवाब मलिक
  • नितीन राऊत
  • नाना पटोले
  • जयंत पाटील
  • सतेज पाटील
  • नरहरी झिरवळ
  • सुनील केदार
  • डेलकर परिवार
  • भास्कर जाधव
  • छगन भुजबळ
तर पवार आणि ठाकरे कुटूंबियांची सुरक्षा आहे तशीच आहे. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, तर जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावर राजकीय वर्तूळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा

Back to top button