पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या आमदार रोहित पवार आणि प्रा. राम शिंदे यांच्यात ट्विटर वॉर सुरू आहे. नुकतेच पवार यांनी, ज्याला पैसा आणि अहंकाराची 'खाज' आहे, ज्याला हाफकीन संस्था आहे की व्यक्ती हेही माहित नाही. जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू? राम शिंदे साहेब पुड्या सोडू नका, 'खेकड्या'ची चाल लोकं स्वीकारत नाहीत, हिम्मत असेल तर याचा पुरावा द्या आणि यापुढं तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा… मग मैदानात बघू! असं ट्विट करत आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रा. राम शिंदे यांना प्रत्यूत्तर दिले आहे. वाचा काय आहे प्रकरण…
आमदार राम शिंदे यांनी दि. २८ सप्टेंबर रोजी आपल्या चोंडी येथील निवासस्थानी आज दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या फराळ कार्यक्रमा दरम्यान शिंदे आमदारांशी बोलताना आमदार रोहित पवारांवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, "आजच्या दिवाळी फराळ कार्यक्रमास आरोग्य मंत्री तानाजी सावंत आले होते. त्यांना आमदार रोहित यांनी दहा फोन करून सांगितलं, साहेब नका ना जाऊ, माझ्या मतदारसंघात. पण माझे आणि तानाजी सावंत यांचे मैत्रीचे संबंध आहेत, असं कुठं असतं का राजकारणात," असे म्हणत राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.
प्रा. राम शिंदे यांच्या फराळ कार्यक्रमाला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते माध्यमांशी बोलताना रोहित पवारांच नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, "२०२४ ला हातात झाडू घेऊन हा मतदारसंघ साफ करायचा आहे.र"
राम शिंदे यांच्या आरोपाला आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, " ज्याला पैसा आणि अहंकाराची ** आहे, ज्याला हाफकीन संस्था आहे की व्यक्ती हेही माहीत नाही, जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू? राम शिंदे साहेब पुड्या सोडू नका, 'खेकड्या'ची चाल लोकं स्वीकारत नाहीत, हिम्मत असेल तर याचा पुरावा द्या आणि यापुढं तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा…मग मैदानात बघू!
हेही वाचा