नागपूर : सेक्स रॅकेटशी संबंधित असल्याच्या संशयावरून दोन रशियन तरुणींना अटक | पुढारी

नागपूर : सेक्स रॅकेटशी संबंधित असल्याच्या संशयावरून दोन रशियन तरुणींना अटक

नागपूर,पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना नागपूर येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर रशियातून नागपूरात टूरिस्ट व्हिसावर आलेल्या दोन रशियन तरुणींना येथील एका इंटरनॅशनल दर्जाच्या हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही तरुणी नागपूरात देहव्यवसायासाठी आल्या होत्या, अशी सुत्रांनी माहिती  दिली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शुक्रवारी नागपूरात भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरात विदेशातील क्रिकेटप्रेमींची गर्दी वाढणार आहे. अनेक विदेशी पाहुणे नागपूरातील नामांकित हॉटेलमध्ये थांबतात. ही बाब लक्षात घेऊन रशिया-युक्रेन या देशातील दोन तरुणी देहव्यापार करण्यासाठी नागपूरात आल्या होत्या.

दोन्ही तरुणी नागपूरातील एका सेक्स रॅकेटशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा व्हिसा दलालाने जप्त केला आहे. यापूर्वीही नागपूरमध्ये रशियन तरुणी देहव्यापार करण्यासाठी आल्या असताना त्यांना पोलिसांनी अटक केली होती.

हेही वाचा

नादुरुस्त, जुन्या कारची भरपाई नव्या कारने करा : सर्वोच्च न्यायालयाचे डिलरला आदेश 

अलिबाबा दास्‍तान-ए-काबुल : व्‍यापाऱ्यांच्‍या तावडीतून सुटकेसाठी अली काय करेल?

सोलार पीव्ही मोड्युल ट्रान्स-२ उद्योगासाठी पीएलआय योजना राबविली जाणार

Back to top button