

पुढारी ऑनलाईन डेस्क : मी नागपूर शहरातील सर्व पदे बरखास्त करणार आहे. घटस्थापना दिवशी नवीन कार्यकारिणी जाहीर करणार आहे, अशी घाोषणा आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नागपूर दौऱ्यावेळी केली. पत्रकार परिषदेत त्यांनी २०१९ नंतरच्या महाराष्ट्रातील राजकारणावर सडकून टीकाही केली.
राज ठाकरे विदर्भ दौर्यावर आहेत. कोरोना नंतरचा हा त्यांचा पहिलाच नागपूर दौरा आहे. यानिमित्त आयाेजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, "कोरोना काळानंतर पहिल्यांदाच नागपूर दाैर्यावर आलो आहे. कोरोना काळात राजकारण करणं याेग्य नव्हते. आता नागपूर शहरातील मनसेची सर्व पदे बरखास्त करणार आहे. घटस्थापना म्हणजे २६ सप्टेंबरला नवी कार्यकारिणी जाहीर केली जाईल. कार्यकारिणी बरखास्त संदर्भात विचारले असता ते म्हणाले, काही चुकीच्या गोष्टी घडत होत्या. पक्षाला १६ वर्षे झाली; पण म्हणाव तसं काम नव्हत. तरुणांना नव्या कार्यकारिणामध्ये संधी देण्यात येईल. नवरात्रीनंतर कोल्हापूर मार्गे कोकण दौरा झाल्यानंतर इथल्या पक्षबांधणीवर लक्ष देणार आहे."
मनसे आणि भाजप युती होणार का? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले प्रस्थांपितांविरोधात जावूनच मोठा होता येतं, नागपुरात भाजप असेल तर त्यांच्याविरोधात लढावे लागेल. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील २०१९ नंतरच्या राजकीय परिस्थितीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, "सध्या राजकारणात वैयक्तिक टीका खूप वाढली आहे. राजकारण हे वैयक्तिक नसतं, औपचारिक धोरणांवर टीका करावी. मनसेने मविआचं कधी कौतुक केले नाही. धोरणांना विरोध होता वैयक्तिक विरोध कधी नव्हता. सध्या कोणी कोणासोबत जातय हेच कळत नाही. आताची जी परिस्थिती आहे अशी गोंधळाची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती."
सद्या चर्चेत असलेला विषय म्हणजे फॉक्सकॉन प्रकरणा बद्दल विचारलं असता ते म्हणाले, " फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, या प्रकणात पैशांचा व्यवहार झाला का हे पहावे लागेल. नेमकं फिसकटल कुठे हे पहावं लागेलं. महाराष्ट्रात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? केला. येणाऱ्या उद्योगांकडे आपलं लक्ष नसेल, पैसे मागत असु, उद्योग आपल्याकडे का येतील? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गुजरातने कदाचित चांगली ऑफर दिल्याने हा प्रकल्प गुजरातला गेला असेल. महाराष्ट्रात आलेला उद्योग बाहेर जातो याच्यासारखं दुर्दैव नाही. असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी विलासराव देशमुखांच्या काळातील एका प्रकल्पाचं उदाहरणंही दिलं, विसासरावांच्या काळात विलासरावांनी नकारघंटा वाजवल्याने बीएमडब्लयुचा प्रकल्प तामिळनाडूत गेला., असेही त्यांनी सांगितले.
राजकारणाची पातळी खोलावत आहे याला जबाबदार कोण आहे? यावर ते म्हणाले मतदारांनी राज्यकर्त्यांना वठणीवर आणायला हवं. माझ्यालेखी विदर्भ महाराष्ट्रातचं आहे. लोकांना विचारा वेगळा विदर्भ हवा की नको. माझ्या कोणत्याही भूमिकेत बदल झालेला नाही असेही म्हणाले. बहुसदस्य प्रभाग लोकशाहीला घातक आहे. यावेळी मनसेचे नगरसेवक नक्कीच वाढतील चार-चार नगरसेवक लोक कधी लक्षात ठेवतील. एक प्रभाग एकाच व्यक्तीने पाहावा. महापालिका ओरबडण्यासाठी ही पद्धत आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचलंत का?