सातारा : खेड ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे गटाचा झेंडा (Video) | पुढारी

सातारा : खेड ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे गटाचा झेंडा (Video)

सातारा : पुढारी वृत्तसेवा; सातारा शहरालगतच्या सर्वात मोठ्या खेड ग्रामपंचायतीवर आ. महेश शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. त्यांच्या खेड ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने 12 जागांवर विजय मिळवला असून, सरपंचपदही काबीज केले आहे. तर आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील व आ. शिवेंद्रराजे भोसले समर्थकांच्या खेड ग्रामविकास पॅनेलचा पराभव झाला. त्यांना अवघ्या 5 जागांवर समाधान मानावे लागले. या ग्रामपंचयातीत सत्तांतर झाले आहे.

या निवडणुकीत आ. महेश शिंदे गटाच्या विनोद माने, सुलभा लोखंडे, संतोष शिंदे, सुधीर काकडे, स्मिता शिंदे, सुमन गंगणे, शरद शेलार, वंदना गायकवाड, शामराव कोळपे, प्रियांका संकपाळ, चंद्रभागा माने यांच्यासह 12 उमेदवारांनी विजयी पताका फडकावली. त्यांच्याच गटातील लता अशोक फरांदे यांनी सरपंच पदावर बाजी मारली. विरोधी खेड ग्रामविकास पॅनेलचे कांतीलाल कांबळे, सुशीला कांबळे, निखिल यादव यांच्यासह 5 उमेदवार विजयी झाले.

हेही वाचा :  

Back to top button