नागपूर : जुगार आणि व्यसनासाठी ‘तो’ करायचा वाहन चोरी


मध्यप्रदेश मधील अट्टल वाहनचोराला नागपूरात अटक
मध्यप्रदेश मधील अट्टल वाहनचोराला नागपूरात अटक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जुगार आणि इतर व्यसन पूर्ण करण्यासाठी वाहन चोरी करून विकणारा अट्टल चोरटा नागपूर पोलिसांच्या हाती लागला आहे. तो मध्य प्रदेशातून नागपुरात यायचा, काही दिवस मुक्काम ठोकायचा, नंतर संधी साधून तो दुचाकी चोरी करायचा हे ऐकून पोलिसही चक्रावले आहे.

अट्टल चोरट्याला पकडण्याची ही कामगिरी नागपूरच्या धंतोली पोलिसांनी केली आहे. मध्यरात्री योग्य संधी साधून नागपुरातील गजबजलेल्या परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

विशेष म्हणजे आरोपी स्वत:ची चैन भागवण्यासाठी दुचाकी चोरी करायचा. तो जुगार आणि इतर व्यसन पूर्ण करण्यासाठी वाहने चोरी करायचा, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या तब्बल १३ दुचाकी जप्त केल्या आहेत.

संबंधित दुचाकी चोराचं नाव संदीप टेंभरे असल्याची माहिती समोर आली आहे. तो खरंतर मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. पण नागपुरात दुचाकी चोरीच्या उद्देशाने यायचा.

तो नागपुरात येत-जात असायचा. काही दिवस नागपुरात राहायचा. तो नागपुरातील गजबजलेल्या परिसरातून दुचाकी चोरायचा. त्या दुचाकी तो मध्य प्रदेशात घेऊन जायचा. तिथे तो आपल्या ओळखीच्या लोकांकडे दुचाकी गहाण ठेवायचा. त्यांच्याकडून त्यामोबदल्यात मिळालेल्या पैशातून आपल्या चैन भागवायचा. आरोपी त्या पैशांमधून दारुचं व्यसन करायचा. तसेच जुगार खेळायचा.

आणखी काही दुचाकी चोरल्याची शंका

नागपुरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. वारंवार दुचाकी चोरीच्या तक्रारी येत असल्याने पोलिसांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली. पोलिसांनी रात्रीच्यावेळी गस्त वाढवली. या दरम्यान त्यांना आरोपी संदीप टेंभरे सापडला. त्याला पोलिसांनी काही प्रश्न विचारले असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला.

पोलिसांना त्याच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. यावेळी आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. आरोपीने आतापर्यंत १३ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच त्या दुचाकी नेमक्या कुणाकडे गहाण ठेवल्या याची देखील माहिती दिली.

पोलिसांनी कारवाई करत त्या सगळ्या दुचाकी जप्त केल्या. पोलिसांनी आरोपीने आणखी काही दुचाकी चोरल्याची शंका वर्तवली आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. या चौकशीत आणखी काही चोरीच्या घटना उघड होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे ही वाचलत का :

#26/11 : फ्रंटलाईन वर्करच्या भूमिकेत असणाऱ्या डॉ. सुजाता म्हणजेच मृण्मयी देशपांडेचा अनुभव

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news