भंडारा : घरगुती गॅस सिलिंडरच्या भडक्यात तिघे जखमी | पुढारी

भंडारा : घरगुती गॅस सिलिंडरच्या भडक्यात तिघे जखमी

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : पवनी येथे घरगुती गॅस सिलिंडरच्या भडक्यात तिघे जखमी झाले आहेत. येथील रहिवासी लेकराम रामचंद्र ढेंगरे (वय. ५० ), त्यांची पत्नी पुष्पा ( वय ४५) व मुलगा स्वप्निल (वय.२६) अशी जखमींचे नावे आहेत. आज सकाळी घरगुती  गॅस सिलिंडरची गळती झाल्याने गॅसचा भडका उडाला होता. यात हे तिघेही जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय पवनी येथे दाखल करण्यात आले.

रुग्णालयात भाजलेल्या भागावर उपचार करण्याची वैद्यकीय सुविधा नसल्याने लेकराम यांना नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. सोमवारी (दि.२९) सकाळी चहा बनविण्यासाठी लेकराम यांनी गॅस सुरू केला असता गॅस गळती झाल्याने भडका उडाला. यात त्यांच्या हाताला भाजले. शेजारी असलेल्या पत्नी व मुलगा यांचेपर्यंत ज्वाला पोहोचल्या. यात त्या दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. तिघांवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. गॅस गळती होत असल्याची माहिती लेकराम यांनी गॅस रिफिल पोहचविण्यासाठी आलेल्या कामगाराला दिली होती. पण त्याने काळजी घेतली नाही असे कुटुंबियांनी सांगितले आहे. परिणामी गॅस गळती झाली. तत्परता दाखविली त्यामुळे अनर्थ टळला. संबंधितांना विम्याचा लाभ मिळावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button