नागपूर-मुंबई समृद्धी मार्गांवरचा पूल कोसळला | पुढारी

नागपूर-मुंबई समृद्धी मार्गांवरचा पूल कोसळला

वाशीम : पुढारी वृत्तसेवा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. वाशीम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर जोगलदरी गावाजवळ पुलाचे काम चालू असताना पुलाचा काही भाग कोसळला. ही घटना २५ ऑगस्ट रोजी रात्री घडली. यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. २५ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा जोगलदरी गावाजवळील पुलाचे बांधकाम कोसळले. यामध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

पुल कोसळल्याची घटना घडल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली. या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. घडलेली घटना कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून संबंधित कंत्राटदाराने रात्रीतून त्याजागेवर रोलर फिरवून सावरासावर केल्याचे समजते. रस्त्याचे काही ठिकाणचे काम बाकी असून उद्घाटनासाठी देखील तारखांवर तारीख सुरू आहे. रस्त्यांचे काम खरंच गुणवत्तापूर्वक सुरू आहे का, हे संबंधित विभागाकडून तपासून पाहण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Back to top button