गलिच्छ राजकारणातून माझ्यावर आरोप : समीर वानखेडे | पुढारी

गलिच्छ राजकारणातून माझ्यावर आरोप : समीर वानखेडे

वाशीम: पुढारी वृत्तसेवा: गलिच्छ राजकारण करून खोट्या जात प्रमाणपत्राचे आरोप माझ्यावर करण्यात आले. ते आरोप खोटे ठरले असून वानखेडे कुटुंबियांनी नवाब मलिक यांच्याविरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना नोटीस पाठविली आहे, अशी माहिती एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली.

‘एनसीबी’चे माजी विभागीय संचालक आणि सध्या डीजीटीएस विभागाचे अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे हे त्यांच्या वाशिम जिल्ह्यातील वरुड तोफा या मूळगावी आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे ज्यांना आवडलं नाही. त्यांनी मला सोशल मीडियामधून धमक्या दिल्या आहेत. त्यांच्याविरोधात मी मुंबईच्या गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

‘एनसीबी’चे अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खान यांच्या मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. त्याचबरोबर माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपा संदर्भात विचारले असता हे प्रकरण न्यायालयात असल्याने सांगून वानखेडे यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button