चंद्रपूर पुढारी वृत्तसेवा : एसटी डेपो मध्ये कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने दोन अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून स्वतःच्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली. ही घटना साेमवारी उघडकीस आली. भगवान अशोक यादव (वय 30, रा. कन्नमवार वार्ड, टेकडी, बल्लारपूर ) असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते राजूरा एसटी डेपोत टी.सी. पदावर कार्यरत होते. त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून या चिठ्ठीमध्ये अधिकारी पैशाची मागणीकरीता सारखा तगादा लावत असल्याचे म्हटले आहे.
भगवान यांची पत्नी रक्षाबंधनाकरिता बाहेरगावी गेल्या हाेत्या. घटनेच्या रात्री त्यांनी मित्रांसोबत गप्पागोष्टी केल्या. त्यानंतर आईने जेवण वाढले. परंतु नंतर जेवण करतो, असे त्यांनी सांगितले. सर्व झोपी गेले. रात्री त्याने बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपविले. या घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. व शवविच्छेदनासाठी पाठविला.
पोलिसांनी केलेल्या तपासात मृतदेहाच्या खिशात आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी आढळून आली आहे. त्या चिठ्ठीमध्ये माझ्या मृत्यूला एसटी डेपोतील दाेन अधिकारी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. अधिकारी दहा हजार रूपये महिना मागत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. डेपोतील ते दोन अधिकारी कोण? कशाकरीता त्या कर्मचा-याला त्रास देत होते, दहा हजार रुपये महिना कशासाठी मागत होते? पोलिस प्रशासन कशाप्रकारे कारवाई करणार? याकडे एस टी डेपो कर्मचा-यांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे.
हेही वाचा