हिंगोली : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

हिंगोली : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Published on
Updated on

सेनगाव; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव (जि. जालना) येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर पुणे येथे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात 21 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील मुलीला काराळा (ता. परतूर) येथील 21 वर्षीय अल्पवयीन मुलाने मुलगी अल्पवयीन माहीत असतानाही लग्नाचे आमिष दाखवले. तिला फूस लावून 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान पानकनेरगाव, रिसोड, इंडियन हॉटेल वाघोली पुणे येथे  वेळोवेळी अत्याचार केला असा जबाब पीडितीने दिला आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात छत्रगुन पुंजाराम सोळंके (रा. काराळा, ता. परतुर) या 21 वर्षीय आरोपी तरुणावर भा.दं. वि. सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दुस व सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे हे करत आहेत.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news