अकोला : विशेष पोलिस पथकाचा क्रिकेट सट्यावर छापा, १ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

अकोला : विशेष पोलिस पथकाचा क्रिकेट सट्यावर छापा, १ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

अकोला; पुढारी वृत्तसेवा : भारत आणि वेस्टइंडीजमधील टी – 20 क्रिकेट मॅचवर सट्टा चालवणा-या एकाला जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पोलिस पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई ७ ऑगस्ट रोजी रात्री शहरातील जठारपेठ भागातील एका घरात करण्यात आली. याप्रकरणी मोहित शंकरलाल शर्मा (वय 30, रा केला प्लॉट जठारपेठ) याच्‍यावर गुन्‍हा दाखल झाला आहे. एलईडी टीव्‍ही ०६ मोबाइल, नगदी ६०,००० रुपये आणि चिट्ठया असा एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

माेहित शर्मा हा आपल्या घरात टी-20 सामन्‍यावर सट्टा चालवणात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास  मिळाली. पथकाने 2 पंचासमक्ष छापा मारला. मोहित हा आपल्‍या घरात मोबाईल फाेनच्या साहाय्याने लोकाकड़ूंन पैसे स्वीकारुत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. त्‍याच्‍याकडून ६० हजार रुपयांची राेकड, ५५ इंच टीव्‍ही, सहा मोबाइल, पैसे हिशोबाच्‍या चिट्ठया आणि कागदपत्र, एक्सटेंशन बॉक्स, डीटूएच बॉक्स असा एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला आहे.

मोहित शंकरलाल शर्मा याच्‍या विरुद्ध सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबन्धक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने केली.

हेही वाचा :

Back to top button