कुसमोड शिवारात तरुणाचा खून | पुढारी

कुसमोड शिवारात तरुणाचा खून

पिलीव : पुढारी वृत्तसेवा कुसमोड (ता. माळशिरस) येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून झाला आहे. ही घटना शनिवार दि. 6 रोजी रात्री घडली आहे. विकास सोपान वाघमारे (वय 37) रा.कुसमोड असे खुन झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत विकास सोपान वाघमारे हा त्याच्या राहत्या घरातून विहिरीवर विद्यूत मोटार चालू करण्यासाठी रात्री 8च्या सुमारास गेला होता. बराच वेळ उलटून गेला तरी विकास परत आला नाही, म्हणून पत्नीने फोन केला. फोन ची रिंग वाजत होती, मात्र फोन उचलला जात नव्हता. दरम्यान विकास वाघमारे यांचा खून झाला असल्याची बातमी शिवारात पसरली.

जवळपास च्या नागरिकांनी पोलिस चौकीला फोन वरून कळविल्या प्रमाणे माळशिरस तालुका पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेळके, हवालदार सतीश धुमाळ, दत्तात्रय खरात, अमित जाधव यांना घटनास्थळी  पाठविले. पोलिसांनी रितसर पंचनामा करून डेडबॉडी माळशिरस येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, पोलिसांनी झिंजेवस्ती येथील दोघा संशयिताना पुढील चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले आहे. मयत विकासच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

Back to top button