अकोला : गर्लफ्रेंडने लॉजवर येण्यास दिला नकार; युवकाने ‘तो’ व्हिडिओ केला व्हायरल | पुढारी

अकोला : गर्लफ्रेंडने लॉजवर येण्यास दिला नकार; युवकाने ‘तो’ व्हिडिओ केला व्हायरल

अकोला; पुढारी वृत्तसेवा : प्रेमप्रकरण कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही. या घटनेत गर्लफ्रेंडला वारंवार लॉजवर बोलावून अत्याचार करणाऱ्या अकोल्यातील एका युवकाला चांगलच महागात पडलं आहे. युवकाने नकार देणा-या युवतीचे व्हिडिओ व्हायरल करीत तिची बदनामी केल्याप्रकरणी शेगाव पोलिसांनी अकोल्यातून गुरुवारी (दि. ५ ऑगस्ट) संबंधित युवकास अटक केली. प्रतिक गजानन मानकर (वय २३, राहणार वाडेगाव, ता. बाळापूर, जि. अकोला) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहितीनुसार, संबंधित युवकाचे अकोल्यातील एका युवतीसोबत प्रेमसंबध होते. त्याने तिच्यावर असलेल्या प्रेमाचे वचन देवून शेगाव येथे नेले. तिच्यासोबत शारिरिक संबध प्रस्थापित केले. मात्र युवतीला तो आपली फसवणूक करीत असल्याचे लक्षात येताच तिने त्याला नकार दिला. तेव्हा त्याने तिच्यासोबतचे व्हिडिओ व्हायरल केले. यानंतर तरुणीने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर शेगाव पोलिसांनी युवकाचा शोध घेवून त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अकोल्यातून आज ही अटक करण्यात आली.

हेही वाचा

Back to top button