China-Taiwan : चीनची 100 लढाऊ विमाने, 10 युद्धनौका तैवानच्या वेशीवर | पुढारी

China-Taiwan : चीनची 100 लढाऊ विमाने, 10 युद्धनौका तैवानच्या वेशीवर

बीजिंग/तैपेई; वृत्तसंस्था : तैवानच्या सभोवताली चीनने सुरू केलेल्या सर्वात मोठ्या युद्धसरावात सलग दुसर्‍या दिवशी चीनची 20 लढाऊ विमाने आणि 10 युद्धनौका तैवानच्या हवाई हद्दीत घुसल्या होत्या. या युद्धसरावात चीनची जवळपास 100 लढाऊ विमाने आणि १० युद्धनौका सहभागी झाल्या आहेत. एकप्रकारे या युद्धसरावातून चीनने आपले मोठे सैन्य तैवानच्या वेशीवर आणून ठेवले असून तैवानवर मोठा दबाव निर्माण केला आहे. (China-Taiwan)

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले, आमचा विरोध असतानाही पेलोसी यांनी तैवानचा दौरा केला. ही आमच्यासाठी गंभीर बाब आहे. पेलोसी यांनी आमच्या अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ केली आहे. त्यांनी वन चायना पॉलिसीचे उल्लंघन केले आहे. त्यांनी तैवानला भेट देऊन या भागातील शांतता धोक्यात आणली आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 20 चीनी लढाऊ विमाने आणि 10 युद्धनौका तैवानच्या आखातात तैवानच्या हद्दीत आले होते. चीनकडून जाणीवपूर्वक अशी कृती केली जात आहे.

आम्ही क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे. चीनच्या हालचालींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. चिनची ही कृती भडकावू आहे, असे तैवानने म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी चिनला न जुमानता केलेल्या तैवान दौऱ्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने त्यांच्या एक क्षेपणास्त्राची चाचणी पुढे ढकलली. (China-Taiwan)

पेलोसी यांच्यावर चीनचे निर्बंध (China-Taiwan)

दरम्यान, चीनने अमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्यावर निर्बंध लागू केले आहेत. तथापि, हे निर्बंध कशाप्रकारचे आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (China-Taiwan)

हेही वाचलंत का?

Back to top button