गडचिरोलीत गटारीत आढळला मृतदेह | पुढारी

गडचिरोलीत गटारीत आढळला मृतदेह

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली येथे पोटेगाव मार्गावरील गटारीत आज सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृत व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या जखमांवरुन खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अधिक माहिती अशी की, पोटेगाव मार्गावर जिलानी बाबांचा दर्गा आहे. या दर्ग्याजवळून आटाचक्कीकडे एक रस्ता जातो. या रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत आज सकाळी एक मृतदेह नागरिकांना दिसला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत व्यक्तीच्या कपाळावर धारदार शस्त्राच्या खुणा तसेच कान कापलेले होते. शिवाय गळ्यातही दोरीसारखा फास होता. त्यामुळे खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button