गोंदिया; पुढारी वृत्तसेवा : गोंदिया जिल्ह्यातील अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल रात्री ११ वाजता घडली. आमगाव तालुक्यातील नवेगाव/भजियापार येथील चार युवक हे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील सोलरपंप फिटिंगचे काम करुन घराकडे रात्री परतत होते. या दरम्यान २७ जुलैच्या रात्री ११ च्या सुमारास डुग्गीपार पोलिसस्टेशन अंतर्गत येत असलेल्या खोबा गावाजवळ झालेल्या कारच्या अपघातात चौघा मित्रांचा मृत्यू झाला.
मृतामध्ये रामकृष्ण योगराज बिसेन (वय 24), सचिन गोरेलाल कटरे (वय 24), संदीप जागेश्र्वर सोनवाने (वय 18) आणि वरुण निलेश तुरकर (वय 27) यांचा समावेश आहे. सदर चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे अपघात होऊन या चौघांचाही जागेवरच मृत्यू झाला.
हे ही वाचा :