नागपूर : ५ लाखांच्या चोरीचा बनाव : खुद्द फिर्यादीच निघाला आरोपी | पुढारी

नागपूर : ५ लाखांच्या चोरीचा बनाव : खुद्द फिर्यादीच निघाला आरोपी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील एका घटनेत सावनेर-काटोल मार्गावरील सावंगी शिवारातील विटाभट्टीजवळ भरदुपारी लुटमार झाल्याची घटना घडल्याचा बनाव तेलगाव येथील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने केला. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा तपासात घेतला असता आणि प्रकरणात फिर्यादी स्वतःच आरोपी असल्याचा प्रकार उघड झाल्याने पोलिसांनी या प्रकरणातील फिर्यादीला अटक केली.

त्याने ज्या व्यक्तीकडे रक्कम ठेवली होती. त्या व्यक्तीकडून पोलिसांनी ४ लाख ८० हजार रुपये जप्त केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. फिर्यादीने त्याला लुटण्याचा स्वतःच बनाव का केला? याबाबत चौकशी दरम्यान हीबाब पुढे येईल, असे पोलिसांनी सांगितले. बाबासाहेब गोविंदराव ठाकरे (रा. तेलगाव, ता. कळमेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वेस्टर्न कोल फिल्ड ऑफ इंडियामधून सेवानिवृत्त झालेल्या बाबा ठाकरे याने दोन दिवसांपूर्वी भरदुपारी सावनेर शहरातील बँकेतून ५ लाख रुपयांची उचल केली आणि दुचाकीने गावाला जायला निघाला. वाटेत सावंगी शिवारात दोन दुचाकीने आलेल्या चौघांनी अडवले आणि आपल्यावर चाकूसारखे शस्त्र रोखून डिक्कीतील ५ लाख रुपये हिसकावून घेतले, अशी तक्रार त्यांनी पोलिस ठाण्यात नोंदविली होती. मात्र, या प्रकरणात बाबा ठाकरे हा स्वतः आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button