अग्निपथ योजनेसंदर्भातील याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयात २५ रोजी सुनावणी | पुढारी

अग्निपथ योजनेसंदर्भातील याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयात २५ रोजी सुनावणी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : लष्करातील युवकांच्या भरतीसंदर्भातील अग्निपथ योजना अवैध आणि घटनाबाह्य असल्याचे सांगत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालय 25 जुलै राेजी सुनावणी हाेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच हे खटले दिल्ली उच्च न्यायालयाकडे वर्ग केले होते.

याचिकांबाबतची कागदपत्रे अद्याप सर्वोच्च न्यायालयाकडून प्राप्त झालेली नाहीत, या पार्श्वभूमीवर सुनावणी 25 तारखेला घेतली जाईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रम्हण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाकडून बुधवारी सांगण्यात आले. केरळ, पंजाब, हरियाना, बिहार तसेच उत्तराखंडमध्ये अग्निपथ योजनेला विरोध करीत दाखल झालेल्या याचिकांदेखील दिल्ली उच्च न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

हेही वाचा : 

 

Back to top button