वाशिम; पुढारी ऑनलाईन: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी शिवसेनेच्या वतीने कोंबडी फेको आंदोलन करण्यात आले. कोंबडी फेको आंदोलन हे वाशिम जिल्ह्यातील झाले.
या आंदोलनात वाशिम शहर पोलिस स्टेशन येथे तक्रार देऊन नारायण राणे याच्यांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली.
आंदोलनकर्त्यानी वाशिम शहरातील पाटनी चौकात रस्त्यावर उतरून कोबडी फेको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल महाडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केल्याने त्याचे पडसाद वाशिममध्ये उमटले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून यावेळी शिवसैनिकाडून राणेविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रामदास मते पाटील, उपजिल्हा प्रमुख महादेव सावके, युवा सेना प्रमुख रवि भांदुर्गे, गजानन भांदुर्गे, बालासाहेब देशमुख, अशोक शिराळ, विजय खनजोडे, राजाभैया पवार, गजानन भुरभुरे, सतीश खंडारे, समीर कुरेशी, नामदेव हजारे, गजानन ठेंगड़े ,कैलास गोरे,नितिन मडके तसेच शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान सोमवारी संध्याकाळी महाड येथील पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद महाडमध्ये उमटले. संतप्त शिवसैनिकांनी आज राष्ट्रीय महामार्गावर नारायण राणे यांचा पुतळा जाळून महामार्ग अर्धा तास रोखून धरला.
हेही वाचलं का?
पाहा : परदेशात कमावण्याची संधी देते हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण