अकोला : माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडेंना दोन २ वर्षांची शिक्षा

अकोला; पुढारी वृत्तसेवा : येथील अग्रसेन चौकात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. डी. गव्हाणे यांनी सबळ पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे गुलाबराव गावंडे यांना कलम ३५३ अन्वये दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच हजार दंड व कलम २९४ अन्वये २००० रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहे
पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून रामदास पेठ पोलिस ठाण्यात गावंडे यांच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी तिघांना पुराव्याअभावी न्यायालयाने सुटका केली आहे. सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपक गोटे यांनी काम पाहिले. त्यांना सिएमएस सेलचे राम पांडे व पोलिस ठाण्याचे बळीराम चतारे यांनी सहकार्य केले.
हेही वाचलंत का?
- पिंपरी : सोशल मीडियावर मायलेकींची बदनामी
- पिंपरी : महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांनी सुचविलेली विशिष्ट औषधे मिळतच नाहीत
- नगर : शहरातील पथदिव्यांच्या वीज मिटरमधून चोरी